नाशिक : महामारीच्या साथीने मागच्या वर्षी आषाढी वारी इतिहासात पहिल्यांदाच थांबली गेली. मात्र, यंदाही महामारीचे सावट कायम असल्याने आघाडी सरकारने, या वर्षीच्याही आषाढी वारी संदर्भात, राज्यातील मानाच्या १० महत्त्वाच्या पालख्यांसोबतच आषाढी वारी करण्यास परवानगी दिली आहे. तसेच, या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी विरोधदर्शवला असून, राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना अमान्य आहे.ने हा निर्णय मागे घ्यावा, नाहीतर रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. नाशिकमध्ये आज पत्रकारांशी बोल्ट असताना त्यांनी ही माहिती दिली.
तसेच, ‘राज्य सरकारने हा निर्णय घेऊन सर्व वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. हा निर्णय वारकऱ्यांना अमान्य आहे. त्यामुळे, तातडीने हा निर्णय सरकारने बदलावा, अन्यथा सर्व पालख्या रस्त्यावर उतरतील आणि त्यामुळे महामारीचा फैलाव वाढल्यास, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हेच जबाबदार असतील,’ असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी, ‘मी स्वत: यावर्षीच्या वारीला पायी पंढरपूरला जाणार आहे. आम्ही वारकरी वारीसाठी रस्त्यावर उतरल्यानंतर, केसाला जरी धक्का लागला, तर गाठ भाजपशी आहे, हे आघाडी सरकारने लक्षात ठेवावे. आमच्यापैकी काही वारकरी येत्या काही दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. जेवढ्या प्रमाणात तिकडे कुंभमेळ्याच्या शेवटच्या शाही स्नानाला गर्दी झाली, तेवढी वारीला नक्कीच होणार नाही. या सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी वारकरी संप्रदाय घेण्यास तयार आहे. मात्र, या सरकारने परस्पर निर्णय घेतला,’ अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे.
आषाढी एकादशी दिवशी भाविकांसाठी मंदिर राहणार बंद
आषाढी एकादशी दिवशी भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार आहे. केवळ मानाच्या १० पालख्यांना आणि त्यासोबत असलेल्या वारकऱ्यांनांच मंदिरात प्रवेश आहे. तसेच, रिंगण आणि रथोत्सवालाही निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे.
मानाच्या १० पालख्यांची नावे
- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
- संत सोपान काका महाराज (सासवड)
- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
- संत तुकाराम महाराज (देहू)
- संत नामदेव महाराज (पंढरपूर)
- संत एकनाथ महाराज (पैठण)
- रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती)
- संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)
- संत चांगाटेश्वर महाराज (सासवड)
Read Also :
- नागपूर राष्ट्रवादीत असंतोष: दुनेश्वर पेठेंच्या नियुक्ती नंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
- प्रशांत किशोर-पवारांमध्ये तीन तास राजकीय खलबंत; २०२४ ला कायापालटाचे नेतृत्व शरद पवारांकडे?
- संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डीत; बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेणार
- राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडेच आहेत, त्यामुळे जमवून घ्यावे लागते
- ‘नागरिकांसोबत मग्रुरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही’