पिंपरी: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात शनिवारी सकाळी भेट दिली. यावेळी कोविड-१९ वॉररुमची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, महापालिका आयुक्त राजेश पाटील आदी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येणारे ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमध्ये एका रुग्णाला मोफत ‘आयसीयू’ बेड उपलब्ध करुन देण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल १ लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड आणि नगरसेवक विकास डोळस यांनी उघडकीस आणल्यानंतर, हे प्रकरण चांगेलच जोर धरू लागले आहे.
त्यातच यात स्पर्श हॉस्पिटल तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एका नगरसेविकाचा देखील हात असल्याचे बोलले जात असल्याने, “ती” नगरसेविका कोण हे देखील गूढ वाढू लागले आहे.
दरम्यान, या विषयाच्या अनुषंगाने आज पत्रकारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांना, अतिरिक्त आयुक्तांनी या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अशा गैरप्रकारात नाव आलेल्या त्या नगरसेविकेवर पक्षाकडून काही कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला असता, उत्तरादाखल त्यांनी, “सध्या जिल्ह्यातील आणि राज्यातील परिस्थितीकडे आपण प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे”, असे सांगत या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.
काय आहे कालचे प्रकरण
‘स्पर्श’ हॉस्पिटल गैरप्रकारात हात असलेली राष्ट्रवादीची “ती” कथित नगरसेविका कोण?
‘स्पर्श’ हॉस्पिटल गैरप्रकारात हात असलेली राष्ट्रवादीची “ती” कथित नगरसेविका कोण?