मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत, महिलांवर होणाऱ्या अत्याचारच्या व जीवघेण्या हल्ल्याच्या अश्या काही घटना समोर आल्या आहेत; कि यावरून विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला अक्षरशः धारेवर धरले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या स्मिता वाघ यांनी, विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला असून, ‘गोऱ्हे यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत तोंडाला कुलूप का लावले आहे?’ असा सवाल केला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांकडून महिला सरपंचाला मारहाण; गौरी गायकवाड देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
“राजकीय स्वार्थसाठी पक्षांतरे करून उपसभापती पदावर बसलेल्या गोऱ्हे, या खुर्ची टिकवण्यासाठी ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्याची धडपड करत असून, महिलांवर होणाऱ्या अन्याया बाबतीत त्यांनी तोंडाला टाळे लावलेले आहे. राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना, स्त्री हक्काचा आधार घेऊन वर आलेल्या गोऱ्हे आता कुठे आहेत?” असा तिखट सवालही त्यांनी केला आहे. तसेच, “गोऱ्हे यांना आपल्या जबाबदारीचे भान देखील राहिलेले नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे.
किरीट सोमय्या पुण्यात करणार गौप्यस्फोट, दुपारी 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद
“केंद्रीय मंत्री नारायण राणे ‘जन आशीर्वाद’ यात्रेसाठी आले असता, त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून, त्यांना केलेल्या अटेकनंतर यांची जीभ घसरली, आणि खुर्चीसाठी ठाकरे कुटुंबाची खुशामत करणे गरजेचे असल्याने तसे करताना, त्यांना त्यांच्यावरच्या जबाबदारीचे भान राहिले नाही. त्यामुळे, केवळ मर्जीसाठी महिलांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या गोऱ्हे यांनी, हिम्मत असेल तर राज्यात महिलांवर सुरु असलेल्या अत्याचाराचा पाढा आपल्या सरकारपुढे वाचावा,” असे आवाहन वाघ यांनी दिले आहे.
शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला; कोणत्या मुद्यांवर चर्चां होणार, राजकीय तर्कवितर्कांना उधान
“सत्तेत असलेल्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत आहेत आणि ठाकरे सरकारच्या दबावामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाहीये,” असं म्हणत त्यांनी, “कुठे भर रस्त्यात महिला सरपंचाला मारहाण होते, तर अधिकारी महिलेची बोटे छाटली जातात, कुठे गरीब मजूर महिलेचे अपहरण होते, तर अल्पवयीन बालिकेवर सामूहिक बलात्कार केला जातो, पण उपसभापती मात्र मूग गिळून, सरकारच्या सुरात सूर मिसळून राजकारण करत आहेत, हे लाजिरवाणे आहे,” असा हल्लाबोल वाघ यांनी गोऱ्हे यांच्यावर केला आहे.
Read Also :
- राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, कोण घेणार सातव यांची जागा?
- पुरामुळे घर वाहुन गेले, शेतातील पीके उद्ध्वस्त झाली, आम्ही कसं जगायचं; हवालदिल शेतकऱ्याच्या व्यथा
- पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार
- एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते – ED
- भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ग्वाही