बालेवाडी: लहु बालवडकर सोशल वेलफेअर व सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे येथील नागरीकांसाठी अल्प दरात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने ‘फर्स्ट एडपाँलि-क्लिनीक, चे उदघाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पार पडले.
अशोक चव्हाण यांच अस झाल ‘नाचता येईना अंगण वाकडं’, मराठा आरक्षणावरुन दरेकरांची खोचक टीका
भाषणात बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ‘भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एक सामाजिक भान राखून आपल्या परिने होईल तशी नागरीकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी’ या आवाहनाला प्रतिसाद देत लहु बालवडकर यांनी निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता निस्वार्थ भावनेने बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे या भागात देखिल भविष्यात असे प्रथमोपचार आरोग्य केंद्र सुरु केले जातील असे आश्वासन दिले.
मुंबई लोकलसाठी मनसे आक्रमक, थेट हायकोर्टात याचिका दाखल
यावेळेस कोरोनाच्या कठीण काळात सुध्दा जीवाची पर्वा न करता नागरीकांसाठी काम करणारे या भागातील प्राणी मित्र, गँस सिलेंडर कर्मचारी व वृत्तपत्र वितरक यांना कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यानिमित्त लहु बालवडकर सोशल वेलफेअर च्या वतीने व आमदार चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आला.
जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव
या प्रसंगी डॉ. सचिन गांधी, सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. रोहित बोरकर, भाजपा नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगसेविका ज्योतीताई कळमकर, भा.ज.यु.मो चे शहर अध्यक्ष राघवेंद्र (बाप्पू) मानकर, कोथरुड विधानसभा म. संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश बालवडकर, विद्यमान अध्यक्ष पुनित जोशी, कोथरुड भा.ज.पा महिला आघाडीच्या अध्यक्षा उमाताई गाडगीळ, प्रभाग क्रमांक ९ च्या महिला अध्यक्षा स्वरुपाताई शिर्के, सुस गावच्या सरपंच अपुर्वाताई निकाळजे, महिला आघाडी च्या तसेच भाजपा चे सर्व पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच यावेळी उपस्थित होते.
Read Also :
- “वणवा पेटला रं…”, बैलगाडा बंदीविरोधात आढळराव पाटील उतरणार रस्त्यावर? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
- निवडणूकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
- रिंगरोड बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – चंद्रकांत पाटील
- शरद पवारांचं अमित शहांना ‘गोड’ निमंत्रण; पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? जाणून घ्या
- “शिवसेनेत नाकारल म्हणून बेताल वक्तव्य ,” चित्रा वाघ यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर