कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे सर्वात महत्त्वाचे आहे. मात्र, तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मास्क वापरण्याच्या जनजागृतीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेतील फोटोचा आधार घेतला आहे. त्यातून नागरिकांना भन्नाट संदेश देण्यात आला आहे की, कोरोनाच्या लढाईत….माझी ढाल, माझा मास्क…
"तलवारीला कितीही धार असो, वार अडवायला ढाल लागतेच!"
माझी ढाल… माझा मास्क!@kolhe_amol #coronavirus #COVID19 pic.twitter.com/pJhDatv8Do— Smart Pune (@SmartPune) July 7, 2020
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र, अजूनही नागरिक गांभीर्याने नियम पाळताना दिसत नाहीत. पुणे शहरासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनलॉक दरम्यान अनेक नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता हे टाळण्यासाठी जनजागृतीसाठी प्रशासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी समाजमाध्यमांद्वारे काही कॅम्पेनही राबविण्यात येत आहेत.