उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला पोलिसांनी उज्जैन येथून अटक केले होते. मात्र आता विकास दुबे पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला आहे या एन्काऊंटरनंतर काही सवाल देखील उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे.
अनेकांनी एन्काउंटरविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. त्याविषयी पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, की विकास दुबेबद्दल प्रेम वाटावे, अशी परिस्थिती नाही. असे लोक कोरोनाने गेले काय किंवा आणखी कशाने, काय फरक पडतो, असे सांगत पोलिसांची हत्या करणे हे चुकीचेच आहे. त्याचं एन्काउंटर खरं की खोट, हा तपासाचा भाग आहे. ते त्यांचे सरकार करेल. महाराष्ट्र सरकारकडे आला तर आम्ही करू, असा टोलाही त्यांनी लगावला भुजबळ यांनी लगावला.
नाशिक येथे भुजबळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.