अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंच्या एका आडिओ क्लिपने सध्या अहमदनगर जिल्हा आणि राज्यात खळबळ उडवून दिली असून, पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी यात दिला आहे. यामध्ये त्यांनी थेट कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या बोलण्यातून रोख हा स्थानिक आमदार निलेश लंकेकडे असल्याचे दिसून येत आहे, तर निलेश लंकेंनीही उलट ज्योती देवरेंवर आरोप केले आहेत.
मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
दरम्यान, तहसीलदार देवरे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत असून, त्यांच्याविरोधात आता महसूल कर्मचारी आक्रमक झाले आहेत. देवरे यांच्या दडपशाहीला कंटाळून, तालुक्यातील तलाठी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं असून, यात महिला कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग आहे. देवरे यांची बदली करा, नाहीतर आमची बदली करा! असा त्यांनी पवित्रा घेतला आहे. तसेच, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“दोन्ही निकाल माझ्याच बाजूने, देश कायद्याने चालतो”- नारायण राणे
दुसरीकडे, ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, तहसीलदार देवरे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. याबाबतचा चौकशी अहवाल आता अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केला असून, त्यात देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.
शिवसेनेला भिडणाऱ्या कार्यकर्त्यांचे निलेश राणेंनी मानले मनापासून आभार
तसेच, काही दिवसांपूर्वी ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर तहसीलदार ज्योती देवरे यांनी मौन सोडलं असून, माध्यमांसमोर येऊन त्यांनी, “ती ऑडिओ क्लिप चुकीने व्हायरल झाली असून, केलेलं लिखाण हे मानसिक उद्वेगातून केले आहे आणि नंतर त्याची ऑडिओ क्लिप तयार केली. मात्र ही क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल झाली,” असा दावा करत, “आणखीन डिप्रेशन येऊन २ दिवस फोन बंद ठेवला, मात्र आता मी पूर्णपणे स्टेबल आहे,” असं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- काँग्रेस – राष्ट्रवादीची काय औकात, भांडण लावून सत्तेत आले – चंद्रकांत पाटील
- परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या त्यात गैर काय?- विनायक राऊत
- नारायण राणेंच्या विधानाबाबत बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- आयकर विभागाकडून भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता जप्त, अटकही होणार! सोमय्यांचा दावा
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचा ‘ऍक्शन मोड’, शोधलं ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य