मुंबई : देश महामारीच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः बेजार झाला आहे. या दुसऱ्या लाटेने देशातल्या आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन अजून किती सक्षम आणि बळकट करावे लागणार आहे, याचीच जणूकाही जाणीव करून दिली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काही राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला आणि महामारीवर नियंत्रण कशाप्रकारे मिळवता येईल, यासंदर्भात चर्चा केली. मात्र, यावेळी चर्चेदरम्यान चुकून पंतप्रधान मोदींकडून संवाद साधताना, ‘कोरोना पॉझिटीव्ह केसेस वाढल्या पाहिजेत. टेस्ट वाढवल्या पाहिजेत. आपल्याला सर्व गोष्टीवर लक्ष द्यायला हवं”, असं वाक्य बाहेर पडलं. आणि विरोधकांना मोदींवर निशाणा साधायचं ऐतं कोलितच हातात मिळालं.
प्रधानमंत्री जी 'पॉजिटिव केस' बढाने का प्रयास करने के लिए सिर्फ कह नहीं रहे हैं, बल्कि पश्चिम बंगाल में चुनावी रैलियों में भीड़ गिनकर इन्होंने पहले उदाहरण प्रस्तुत किया है- पॉजिटिव केस बढ़ाने का।
वैसे भी जुबां पर वही आता है, जो दिमाग में चल रहा होता है।#COVID19India pic.twitter.com/EdYromc5pt
— Congress (@INCIndia) May 18, 2021
त्यांच्या तोंडून बोलण्याच्या ओघात बाहेर पडलेल्या या एका चुकीच्या वक्तव्याचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, भाजपचा कट्टर विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाने यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मोदी महामारीच्या पॉझिटीव्ह केसेस वाढण्याबद्दल बोलत आहेत. त्यांनी फक्त हे बोलून नव्हे, तर प. बंगालच्या निवडणुकींच्या सभांची गर्दी जमवून कृतीतूनही करून दाखवलं आहे. अखेर जे डोक्यात सुरु असतं, तेच सहसा तोंडातून येतं”, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Read Also :
- “पंतप्रधान मोदी साहेब, आशा आहे सकारात्मक पाऊल उचलले जाईल”; खत भाव वाढीवरून प्रीतम मुंडेंचे पत्र
- केंद्राकडून लस निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची मला कल्पना नव्हती.
- “माझे पती मंत्री आहेत, त्यांच्याकडे एवढी संपत्ती असताना त्यांना आमदार निवासाची गरज काय?” करूणा धनंजय मुंडे
- मोठी बातमी! पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून तूर्त स्थगिती
- पंतप्रधानांच्या कृतीचा हाच अर्थ, उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा “सामाना” करण्यास समर्थ!