संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली असून तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचे टिझर शेअर केले आहेत. एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली संजय राऊत यांनी ट्विटरला मुलाखतीचे टिझर प्रसिद्ध केले आहेत.
या मुलाखतीचे प्रोमो संजय राऊत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आहेत. संजय राऊत यांनी शुक्रवारी अजून एक प्रोमो शेअर केला असून यावेळी त्यांनी पोस्टमध्ये ‘सत्ता ही विनयाने वापरायची असते”, शरद पवार यांची जोरदार मुलाखत असं लिहिलं आहे.
या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसंच भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत घेतली असून त्यात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
तसेच संजय राऊत यांनी तुम्ही विरोधकांना काय सल्ला द्याल आणि ठाकरे सरकारचं काय भविष्य? असे दोन सवाल केले आहेत. यावर आता शरद पवार आता काय उत्तर देणारं याची उत्सुकता आता सांगल्याना लागून राहिली आहे.
promo 4- Sharad Pawar Interview
सत्ता ही विनयाने वापरायची असते…
शरद पवार यांची जोरदार मुलाखत! pic.twitter.com/FQenPZGBwX— Sanjay Raut (@rautsanjay61) July 10, 2020