पुणे : राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापले आहे. यातच आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट घेतल्यानंतर, आता उदयनराजे आणि संभाजीराजें यांची पुण्यात मराठा आरक्षणप्रश्नी दुपारी १ वाजता भेट होणार असून, पुण्यातील औंध बॅनर रोडवर असलेल्या एका बंगल्यात ही भेट होणार आहे.
सध्या संभाजीराजे छत्रपती मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा आहेत. त्यांनी १६ जूनला कोल्हापुरातून मराठा मोर्चाला सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राजे एकत्र येऊन, सरकारवर दबाव टाकणार का?, उदयनराजे या प्रश्नी नेमकी काय भूमिका घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. कोल्हापूर सारखाच एक भव्य मोर्चा सोलापुरात देखील काढण्याची तयारी, मराठा क्रांती मोर्चाकडून सुरु आहे. त्यामुळे, संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र आल्यास, या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरून दोन्ही राजे एक का नाही असे सवाल विचारले जात होते. त्यामुळे या चर्चांना या भेटीत पूर्णविराम महिन्याची शक्यता आहे. दरम्यान, या भेटीनंतर दोघेही मराठा समाजाला आंदोलनाबाबतची पुढची दिशा सांगणार असल्याचं देखील बोललं जात आहे.
Read Also :
- अजित पवार-छत्रपती शाहूंची लक्षवेधी भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, केले ‘हे’ आवाहन
- ‘वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जाऊ’
- ‘काय भाषा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काहीतरी मान ठेवा’
- ‘परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता’