मुंबई : अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, आपचे खासदार संजय सिंग यांनी केला असून, त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. १० मिनिटांपूर्वी २ कोटींना खरेदी केलेली जमीन, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा कथित आरोप या आप खासदाराकडून करण्यात आला असून, सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे ट्रस्टकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.
दरम्यान, यात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली असून, सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना, “याबाबत ट्रस्ट आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, आता जे जमिनीचं प्रकरण बाहेर आलं आहे. त्यामुळे, आमच्या श्रद्धेला ठेच लागली असून, श्रद्धेच्या नावाखाली गोळा झालेल्या पैशांचा गैरवापर केला जात असेल, तर याला काहीच अर्थ राहणार नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक सांगताना ते म्हणाले, “आपचे खासदार संजय सिंग यांच्याशी माझी फोनवरुन चर्चा झाली. प्रभू श्रीराम आणि अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. काहींनी याचा राजकारणासाठी वापर केला. माझ्याकडे जी माहिती आली आहे, त्यातून तरी काहीतरी गडबड असल्याचं दिसत आहे,’ असे सांगत, ‘हा घोटाळा झाला असेल, तर ट्रस्टच्या प्रमुखांनी सर्वांसमोर येऊन शंका दूर केल्या पाहिजेत.
तसेच, मोहन भागवतांसोबचत, विश्व हिंदू परिषेदच्या नेत्यांनी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील जे समोर आलं आहे त्यात तथ्य आहे की नाही, याचा खुलासा करणं गरजेचं आहे. आमच्यासारख्या अयोध्येसाठी लढा देणाऱ्यांना, नेमकं काय झालं आहे हे कळणं गरजेचं आहे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
रवि मोहन तिवारी और सुल्तान अंसारी ने शाम 7:10 PM पर 2 करोड़ की ज़मीन ख़रीदी शाम 7:15 PM पर राम जन्म भूमि ट्रस्ट के चम्पत राय ने 18.5 करोड़ में उनसे ये ज़मीन ख़रीद ली।
क्या दुनिया में कहीं 5.50 लाख रु प्रति सेकेण्ड ज़मीन महँगी होते देखा है ये काम किया है #चंदा_चोर_चम्पत ने pic.twitter.com/kR6bf6uRlj— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) June 13, 2021