पुणे : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने सहा जणांना अटक केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी; राणेंच्या उमेदवारानेच मारली बाजी
नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय 28, रा हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20 रा हडपसर), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय 28), किरण रामभाऊ काकडे (वय 25), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19 रा भेकराई नगर, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बड्या बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता.
महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर पाट्या मराठीतच कराव्या लागतील; राऊतांचा सज्जड दम
बिल्डरने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपसात संगणमत करून गूगल प्ले स्टोअरवरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले होते. या ॲपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात येत होता. त्या क्रमांकावरून बिल्डर यांना फोन केला. त्यांना फोनवरून उपमुख्यमंत्री यांचा पीए चौबे बोलतोय असे सांगण्यात आले होते. बिल्डर यांना हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडी येथील बाबा भाऊ चोरामले व इतर नऊ जणांच्या मालकीची गट क्रमांक 85/1, 85/3 व 87 मधील एकूण सहा हेक्टर जमिनी संदर्भातील वाद मिटवून टाका असे सांगण्यात आले, तसेच त्यांना गावात पाऊल ठेवू देणार नाही, तुमचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही अशी धमकी देण्यात आली. तसेच बिल्डर यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले.
Read also:
- पाट्या बदलण्याचा खर्च जास्त की काचा बदलण्याचा? संदीप देशपांडेंचा अमराठी व्यवसायिकांना इशारा
- मराठी पाट्या लावायला सांगणारे सरकार मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? इम्तियाज जलीलांचा चिमटा
- लवकरच राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दिसतील; माजी आमदार विजय गव्हाणेंचा गौफ्यस्पोट
- गेली १८ दिवसांपासून गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे अखेर माध्यमांसमोर प्रकटले
- मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा नेता; भाजप नेते प्रविण दरेकरांच वर्चस्व संपुष्टात?