सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोराने मोर्चेबांधणी सुरू असून, २५ ऑगस्टला, फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता सोलापुरात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राणेंच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून सन्यास घेईन – उदय सामंत
२६ ऑगस्टला वंचितचे प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी, शहरातील विविध विकासकामांच्या निमित्ताने मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे, ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत गणेश साळवी होते. याआधीही पालकमंत्री भरणेंसोबतची त्यांची सलगी चर्चेत राहिली आहे.
“राजकीय पक्षात मतभेद असतात पण…”, भाजप खासदार गिरीश बापट यांचा राणेंना घरचा आहेर
दरम्यान, नगरसेवक असलेल्या चंदनशिवे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास, सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे बळ वाढण्यात नक्कीच मदत होणार आहे. सध्या सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहेत. तसेच, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेच्या दृष्टीने राष्ट्रवादीने, बाहेरच्या पक्षातील नेत्यांना पक्ष प्रवेश देण्याचे धोरण अवलंबले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
दुसरीकडे, आता परत ‘एक प्रभाग एक नगरसेवक’ पद्धत लागू करण्याबद्दल निर्देश दिले गेले असल्याने, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, सोलापूर, नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नागपूर या महापालिका निवडणुकांच्या निवडणूका आता या पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
Read Also :
- कोरोना संकटात महाराष्ट्राला सावरण्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही – उद्धव ठाकरे
- “आम्ही आणि मोदी पाहून घेऊ, एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही,”
- “एखाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानखाली मारेन असं म्हटलं तर..” – राऊत कडाडले
- “रडायचं नाही…भिडायचं आणि जिंकायचं, तहसीलदार ताई आम्ही तुमच्या सोबत”
- आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात, शिवसेनेकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल