मुंबई : खनिकर्म क्षेत्रातील बडी कंपनी असलेली वेदांत आणि इलेक्टॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी तैवानची बडी कंपनी फॉक्सकॉन यांनी सेमीकंडक्टर उत्पादित करण्यासाठी प्रकल्प सुरू करायचे ठरवले असून, तो आता गुजपातमध्ये होणार आहे. यावरून विरोधीपक्षाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर फॉक्सकॉन गुजरातला का नेला याचे उत्तर वेदांताच्या अध्यक्षांनी दिले आहे.
सर्व राज्यांमध्ये आमचे लोक गेले. केपीएमजी, आमची फॉक्सकॉनचीही टीम गेली. त्यांनी गुजरातला पसंती दिली. कोणत्याही परिस्थितीत असं समजू नका की, हे सर्व नरेंद्र मोदींनी केलं आहे. आमच्या इंडिपेंडंट एजन्सीनं असं ठरवलं की, गुजरात असं एक राज्य आहे ज्याने सिलिकॉन पॉलिसी सर्वात पहिली सुरू केली, असं वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
“लक्षात ठेवा…! राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे”; तुषार भोसले
1.54 लाख कोटी रूपये गुंतवणुकीचा प्रकल्प आहे. महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पहिल्या पसंतीचे राज्य आहे. मात्र गुजरात सरकारने सेमी कंडक्शन धोरण बनविलं आहे. गुजरात हे देशातील पहिलं एकमेव राज्य आहे. गुजरात सरकार गेल्या फेब्रुवारी पासून गुंतवणुकीसाठी तयार होतं. या पॉलिसीमुळे सेमी कंडक्टर बनविणाऱ्या कंपनीने गुजरातशी संपर्क साधला, असं बोललं जात आहे.
“माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर
सोबतच, रिफआयनरीचं काय करणार आहात? राजापूर रिफायनरीला विरोध करण्याचं खासदारांना सांगायचं.. आमदार समर्थन करत असताना हा दुटप्पीपणा ठेवायचा. म्हणून काल शिंदे साहेबांनी मोदी साहेबांशी चर्चा केल्याची माहिती उद्य सामंत यांनी दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी भविष्यात याच तोडीचा किंबहुना यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ..जो रोजगार अपेक्षित आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिलं असल्याचं सामंत म्हणाले.
Read also
- “शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार, जर परवानगी मिळाली नाही तर..;”गुलाबराव पाटील
- “रशियावरून फडणवींसांचा फोन आला अन्…मला सांगितलं की..”; सांमंताचं वेदांत प्रकल्पावर मोठं वक्तव्य
- “देवाचा कौल घेऊन भाजपात प्रवेश केला”; गोव्यातील काॅंग्रेस आमदाराचं वक्तव्य
- “मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पत्राचा विचार करावा”; सुप्रिया सुळे
- “ही वेळ ‘एकदम ओक्के’ म्हणण्याची नसून कृती करण्याची आहे”; राष्ट्रवादीने शिंदेंना फटकारलं