मुंबई: मागील काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जोरदार धक्का दिला होता. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील आगामी महापालिका, नगरपंचायतींच्या निवडणूक घेण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने त्यावेळी दिले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा जमीन फेटाळला
डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा जो पर्यंत निकाली लागत नाही, तो पर्यंत कोणत्याही निवडणूका पार पडायला नको असा हा ठराव होता. मात्र निवडणूक आयोगाने हा ठराव नाकारल्याने राज्य सरकारने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या संदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट मंत्री विजय वडेट्टीवार आणि मागास वर्ग आयोगावर टीका केली होती.
राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
आता मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोपीचंद पडळकर यांना खरमरीत उत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर लुटमारीचे गुन्हे आहेत. मागील काही दिवसांपूर्वी एका शेतकरी बांधवाने त्यांच्यावर जमीन व्यवहारात फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. एवढंच नाही तर जातीवाचक शिवीगाळ करण्यासारखे गंभीर गुन्हे देखील त्यांच्यावर आहेत. पडळकर हे नवीन आहेत आणि त्यांना ज्ञान थोडं कमी आहे. वो नया नया पंछी है. ज्यादा फडफड फडफड करता है.
कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांना चंद्रकांत दादा शिधा वाटप करणार
मागासवर्ग आयोगाला ५ कोटी रुपयांचा निधी नुकताच सुपूर्द करण्यात आलेला आहे. तो त्यांच्या अधिकृत खात्यावर आहे. अधिकार देण्याचा वगैरे काही संबंध नाही. खर्च करायचा की नाही हा संपूर्ण अधिकार मागासवर्गाला दिलेला आहे असं स्पष्टीकरण देखील वडेट्टीवार यांनी दिलं आहे.
Read also:
- “चंद्रकांत पाटील हे काही राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू नाहीत, त्यांच्या बोलण्याने फरक पडत नाही”; संजय राऊतांचे पाटलांना चिमटे
- “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर सोडवायला अक्कल लागते”; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना सणसणीत टोला
- ठाण्यात खारेगाव रेल्वेच्या पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-सेनेत जुंपली
- नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव; राजेंद्र नागवडेंनी २१च्या २१ जागा जिंकल्या
- फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री