मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरूनवरुन खासदार संभाजीराजे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच प्रश्नावरून छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्यात पुण्यात बैठक पार पडली. दोन्ही राजेंच्या भेटीवर आता काँग्रेस नेते व राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दोन्ही राजे मराठा समाजासाठी एकत्र आले याचा आनंद आहे. समाजाच्या हक्कासाठी आंदोलन करणे त्यात काही गैर नाही. मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा सहकार्य करावे ही विनंती.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 14, 2021
दोन्ही राजे मराठा समाजासाठी एकत्र आले याचा आनंद आहे. समाजाच्या हक्कासाठी आंदोलन करणे त्यात काही गैर नाही. मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा सहकार्य करावे ही विनंती, असे ट्विट करत वडेट्टीवार यांनी या दोन्ही नेत्यांना आवाहन केले आहे.
याआधी देखील ट्विट करत वडेट्टीवार म्हणाले होते की, हाराष्ट्रातील प्रत्येक ओबीसी आज आपल्या हक्कांबद्दल जागरूक आहे, आपले हक्क प्राप्त करण्यासाठी एकत्रित येऊन आवाज बुलंद करत आहे याचा अभिमान आहे. प्रत्येक गाव पातळीवर ओबीसींच्या हक्कांसाठी राबणारे हात असणे आवश्यक असून त्यासाठी ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकणे अत्यंत गरजेचे आहे.
ओबीसी कोणत्याही समाजाविरुद्ध लढाई लढत नसून स्वतःच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करत आहे. राज्यातील ओबीसी चळवळीतील सर्व नेत्यांनी आपल्या बंधूजनासाठी एकजूट व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
Read Also :
- केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चा, प्रीतम मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार ?
- ‘काँग्रेस हाच भाजपाला पर्याय, गावखेड्यात पक्षाचा विचार पोहचवा’; पटोलेंचा कार्यकर्त्यांना आदेश
- ‘महापौरांना काही बोलायची भीती वाटते, त्या आमचा बाप काढतील’
- गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, केले ‘हे’ आवाहन
- ‘वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जाऊ’