पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील धडाडीचा नेता म्हणून ओळखल्या जाणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना विधान परिषदेवर आमदार होणार आहेत. कारण, पुढील वर्षी रिक्त होणाऱ्या पुण्यातील विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक आहेत. तशा प्रकारच्या चर्चाही पिंपरी चिंचवडच्या राजकारणात वारंवार होताना दिसून येतात. २०१६ मध्ये विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी विधान सभा सदस्यांमधून १० आणि स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघातून ७ जणांना विधान परिषदेवर संधी मिळाली होती. पुणे स्थानिक प्राधिकरण संस्था मतदार संघातून त्यावेळी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी राष्ट्रवादीकडून अनिल भोसले यांना अधिकृतपणे उमदेवारी मिळाली होती. लांडे यांनी बंडखोरी केली असती, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फटका बसला असता. मात्र, पक्षश्रेष्ठींनी लांडे यांची समजूत काढल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
अकोल्यातही भाजपची मुसंडी: वसंत खंडेलवाल यांचा झेंडा फडकला, शिवसेनेचा दारुण पराभव
दरम्यान, २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरुर लोकसभा मतदार संघातून लांडे यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, पुन्हा राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली. परिणामी, लांडे समर्थकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. आता २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील लांडे यांच्यासह दोन दिग्गजांना महामंडळावर संधी देत सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यात येईल, असेही बोलले जात आहे.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीबाबत अजून तरी कसलाही विचार नाही – संजय राऊत
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती. लांडे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लांडे यांना पाठिंबा दर्शवला होता. या निवडणुकीत लांडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकांनंतर शिवसेनेने युती तोडली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आता पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद तुलनेने भाजपापेक्षा जास्त आहे. मात्र, स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व उभा करणे अपेक्षीत आहे. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे यांना संधी मिळते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधान परिषदेतून निवृत्त होणारे सदस्य:
भाजप
प्रवीण दरेकर (विरोधी पक्षनेते), सदाभाऊ खोत, सुजिर्तंसह ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड, रामनिवास सिंह, चंदुभाई पटेल, परिणय फुके,
शिवसेना
उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी,
राष्ट्रवादी काँग्रेस
संजय दौंड, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अनिल भोसले
काँग्रेस
मोहन कदम, अमर राजूरकर
Read Also :
- मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- शिवसेना सचिव नार्वेकरांचा अवैधरित्या बांधलेला बंगला जमीनदोस्त; किरीट सोमय्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
- ९६ मतं फुटली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनोदवीर ठरले; आशिष शेलारांनी नाना पटोलेंची उडवली खिल्ली
- विजयाचा भावूक क्षण: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळेंना अश्रू अनावर, फडणवीसही गहिवरले
- महापालिका पोटनिवडणुक: खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात होणार “कांटे की टक्कर”