लातूर : विलासराव देशमुख आणि त्यांच्या परिवारानं ज्या ज्या साखर कारखान्यांचा व्यवहा केला आहे त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याच किरीट सोमय्या म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्या सध्या लातूर दौऱ्यावर आहेत. लातूरमध्येही किरीट सोमय्यांनी साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन अजित पवारांवर आरोप केले. मात्र, लातूरमध्ये किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर यावेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आहेत.
बिघडलेल्या बबड्यासारखी भाजपची अवस्था झाली, नेते खिशात आगपेटी घेवून फिरतायं – निलम गोऱ्हे
लातूर मधील साखर करखान्याच्याव्यवहाराची चौकशी करून डिसेंबर अखेर भ्रष्टाचार समोर आणणार आहे. विलासराव देशमुख आणि त्यांचा परिवार यांनी देखील ज्या साखर कारखान्याचे व्यवहार केले आहेत त्याची मी चौकशी करण्याची मागणी करणार आहे. माफिया पद्धतीने लातूर जिल्हा बँक काँग्रेसने ताब्यात घेतली, असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. अजित पवार यांनी जरंडेश्वर व्यतिरिक्त जे घोटाळे केले त्याची चौकशी झाले पाहिजे. शरद पवारांनी सारवा सारव केली..हे दोघे बनवा बनवी करित आहेत, अजित पवारांच्या बहिणींच्या नावे संपत्ती आहेत, असं सोमय्या म्हणाले.
आरक्षणाची जबाबदारी पार पाडा, अन्यथा लाँगमार्चशिवाय पर्याय नाही; संभाजीराजेंचा सरकारला इशारा
मी फक्त घोटाळे भ्रष्टाचार याबद्दलच बोलणार आहे, शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर आयटीच्या छाप्या वरून जे सुरू आहे,त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मालिकांच काम सुरू आहे, नवाब मलिक यांच्याकडे जे खात आहे,त्याबाबत त्यांनी बोलावं. क्रूझ पार्टी प्रकरण कोर्टात सुरू आहे त्यात जे समोर येईल ते येईल. ईडी आणि आयटीच्या चौकश्या वरून लक्ष हटवण्यासाठी नवाब मलिक बोलत आहेत. कोविड मध्ये मुंबई महापालिकेने मृत्यू लपवले हा भ्रष्टाचार काढला होता. कोविड सेंटरच्या जेवणातही भ्रष्टाचार झाला. आता पर्यंत मी केलेले आरोप कधीच खोटे ठरलेले नाहीत, असं किरीट सोमय्या म्हणाले.
Read Also :
- जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्यांचे दात घशात गेले; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला
- …तर एकनाथ खडसे यांना ईडी वाजत गाजत परत पाठवेल; गिरीश महाजनांचा टिमटा
- देवेंद्र फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचे अधःपतन बघवत नाही – संजय राऊत
- समीर वानखेडे मुस्लीमच आहे, त्याचे वडीलही मुस्लीम; पहिलं लग्न लावून देणाऱ्या कांझी चाच्याचा खळबळजनक दावा
- भाजपला धक्यावर धक्के; उल्हासनगरमधील २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश