विद्यापाठीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत महाविकास आघाडी ठाम असून, या प्रश्नी भाजपा विविध मार्गांनी सरकारला धारेवर धरत आहे. याबाबत एक दिवसापुर्वी आमदार रोहित पवार यांनी कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींगा घेणाऱ्या युजीसी च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये.प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परिक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडं व्यक्त करतात. असे ट्वीट केले होते. हे ट्टवीट युजीसीच्या अधिकाऱ्यांना उद्देशुन केले होते.
कोरोनाला घाबरुन स्वतः सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींगा घेणाऱ्या #UGC च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये.प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी परिक्षेबाबत त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडं व्यक्त करतात.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 16, 2020
मात्र या टि्वट्चा धागा पकडत भाजपाचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळखर यांनी, “तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे ? घरी बसल्याबद्दल सर्वाधिक चर्चा राज्यात कुणाबद्दल चालली आहे ते ठाऊक आहे ना ?” असे खोचक टि्वट करत आपण मुख्यमंत्र्यांना उद्देशून तर ट्वीट केले नाही ना, असा चिमटा काढला.
तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? घरी बसल्याबद्दल सर्वाधिक चर्चा राज्यात कुणाबद्दल चालली आहे ते ठाऊक आहे ना? https://t.co/Jay7RKSZgD
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2020
यावर रोहित पवार शांत बसले नाही त्यांनी भातखळकर यांना सडेतोड उत्तर दिले ते म्हणतात, “इथं विषय चाललाय काय आणि आपण बोलताय काय ! विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा तुम्हाला फक्त राजकारण महत्त्वाचं आहे, हे गेल्या चार महिन्यांत सगळ्यांनीच पाहिलंय. त्यामुळं राजकारणाशिवाय आपल्याला दुसरं काही बोलताच येत नसेल तर शांत बसलेलंच अधिक योग्य राहील.”
विद्यार्थ्यांच्या जिवापेक्षा तुम्हाला राजकारण महत्वाचं आहे, हे गेल्या चार महिन्यांत सगळ्यांनी पाहिलंय
–@RRPSpeaks@mataonline @LoksattaLive @MiLOKMAT @TV9Marathi @zee24taasnews @abpmajhatv @SakalMediaNews @MaxMaharashtra@prabhatkhabar @JaiMaharashtraN@Policenama1 https://t.co/YCn1ioASEU— आपला रोहित – AAPLA ROHIT (@RohitPawarSpeak) July 17, 2020