सांगली – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. आता काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची उत्सुकता असून निवडीचे अधिकार सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलने २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. विरोधी भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनेलने चार जागा राखत ताकद दाखवली आहे. निवडणुकीत महाआघाडीतील राष्ट्रवादीला ९, काँग्रेसचे ४ तर शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत.
‘…तरच आघाडी करू’; वैभववाडी नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीचा शिवसेना, काँग्रेसला इशारा
अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा असून आमदार नाईक हे प्रबळ दावेदार मानले जातात. अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा असला तरी कॉंग्रेसनेही शेवटची दोन वर्षे अध्यक्षपद मागितले आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही अध्यक्षपद आधी काँग्रेसला घ्यायचे की नंतर घ्यायचे तसेच उपाध्यक्षपद आधी घेतले तर संधी कोणाला द्यायची याबाबतचे सर्वाधिकार विश्वजित कदम यांना देण्यात आले आहेत.
विश्वजित कदम यांनी अद्याप याबाबत जिल्हा बँकेमध्ये निवडून आलेल्या संचालकांशी चर्चा केलेली नाही. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राज्यमंत्री कदम आणि आमदार अनिल बाबर यांच्यातही चर्चा झालेली नाही. त्यामुळे चर्चेनंतरच अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. अध्यक्षपदी आमदार नाईक यांच्यावर शिक्कामोर्तब झाले असून घोषणा फक्त बाकी आहे.
टंट्या मामाचं ताबीज करणार कोणत्याही आजारापासून रक्षण; कोरोना काळात भाजपा मंत्र्यांचा नवीन जावईशोध
दुसरीकडे काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार असून कोणाला बहुमान मिळणार, याची उत्सुकता आहे. भविष्यात काँग्रेसला अध्यक्षपद मिळणार असल्याची शक्यता असेल तर विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील व महेंद्र लाड हे प्रबळ दावेदार ठरू शकतात. त्यामुळे उपाध्यक्षपद सध्या जयश्री पाटील यांना मिळणार हे निश्चित आहे.
Read Also :
- ‘..तर आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवू’; शिवसेना नेत्याचा सूतोवाच
- सूर्यकांत दळवींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला थेट मातोश्रीवरून रेड सिग्नल; लवकरच सेनेत मिळणार मोठं पद
- सतेज उर्फ बंटी पाटलांचा विजयी वारू अभेद्य; जिल्हा बँकेत जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत थेट बिनविरोध
- सामाजिक कार्यकर्त्या योगिता मस्केंचा पीसीएमसी स्टार व द रिअल सुपर व्हूमन अवार्ड २०२१ ने गौरव
- मुंबै बँक बिनविरोध; प्रवीण दरेकर, प्रसाद लाडांना विरोधकच नाही