कराड: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक आता प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात आली आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट, डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे. दोन्ही मोहितेंचे आणि सत्ताधारी भोसले या तीनही पॅनलकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. दोन्ही मोहितेंचे मनोमिलन होत नसल्याने आता कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
हे पण वाचा, ‘‘कारखान्याच्या सर्वांगीण हितासाठी आणि सभासदांच्या काळजीपोटीच मी सहकार पॅनलमध्ये’’; मदनराव मोहिते
दोन्ही मोहितेंचे मनोमिलन जरी अश्यक्य असले तरीदेखील राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केलेल्या कराड दौऱ्यात मात्र काहीतरी शिजत आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी रेठरे बुद्रुकसह कऱ्हाडमध्येही काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया वर झाल्या आहे. रेठरऱ्यात त्यांनी डॉ. इंद्रजित मोहितेंसह रयत पॅनलच्या इतर संभाव्य उमेदवारांशी देखील चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांनी नेहमीच विजयाच्या भूमिकेत आपली भूमिका बजवणाऱ्या ऍड. उदयसिंह उंडाळकर पाटील यांच्यासोबत देखील बैठक घेतली आहे.
हे पण वाचा, “विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
सहकार मंत्री विश्वजीत कदम यांनी कऱ्हाडमध्ये दिवसभर ठाण मांडल्याने दोन्ही मोहितेंच्या मनोमिलनाच्या चर्चा पुन्हा एकदा जोरदार झाल्या आहेत. जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात नुकतीच भेट झाली होती. त्यानंतर राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी घेतलेल्या बैठकांमुळे सगळेच पॅनल आता चिंतेत पडले आहेत. तसे आपण डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे आहोत असे जरी त्यांनी सांगितले असले तरीदेखील आगामी काळात होणाऱ्या घडामोडींकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे हे मात्र नक्की. येत्या दोनच दिवसांत निर्णय जाहीर होणार असल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही मोहितेंचे मनोमिलन होण्यासाठी लागणार उशीर हा सत्ताधारी भोसले गटासाठी फायद्याचा ठरू शकतो. असे जाणकारांचे मत आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळणार दुसरा हप्ता
सत्ताधारी गटाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी आता विरोधकांवर टीकांचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे. कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सत्ताधारी जयवंत भोसले सहकार पॅनलच्या प्रचारार्थ बैठकीत सुरेश भोसले यांनी विरोधकांवर सडकून टटिका केली आहे. कृष्णा कारखान्यासाठी दोन्ही मोहितेंचे होणारे मनोमिलन हे फक्त मनोमिलन नाही तर मनी मिलन आहे. सत्तेत येण्यापूर्वी अडचणीत असलेला कारखाना सावरण्याचे काम आम्ही केले आहे. त्यामुळे सभासद नक्कीच आमच्या पारड्यात मते टाकणार याबाबत ,मनात कसलीही शंका नाही असे देखील ते यावेळी म्हटले आहेत.
हे पण वाचा
दोन्ही मोहिते एकत्र न आल्यास सुरेश भोसलेंचा विजयी मार्ग सुखकर होणार
कृष्णा काठी सर्व उमेदवार झाले निश्चित; रयत आणि संस्थापक पॅनलचे मनोमिलन मात्र बारगळले