म्हापसा: म्हापसा मतदार संघातून आमदार जोशुआ डिसुझा यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांचे सुपुत्र असणारे आमदार जोशुआ डिसुझा यांच्याविरोधात कधीकाळी फ्रान्सिस डिसुझा यांच्या छत्रछायेत राजकारणाचे धडे गिरवणारे सुधीर कांदोळकर हे मैदानात उतरले आहेत.
जोशुआ हे वडिलांप्रमाणेच देश, राज्याचा प्रथम विचार करणारे; आरएसएस डिसुझाच्या पाठीमागे ठामपणे उभा
फ्रान्सिस डिसुझा हे बाबुश या नावाने ओळखले जात होते. म्हापसा मतदारसंघात अनेक विकासकामे त्यांनी आपल्या कारकिर्दीत पार पाडली. सर्वसामान्यांशी त्यांचा थेट संवाद असल्याने ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते असे म्हटले तरीही काही वावगे ठरणार नाही. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापश्याच्या विकासासाठी ते अहोरात्र झटत होते हे जनता विसरलेली नाही.
जिंकणारा उमेदवार हा फक्त जोशुआच असल्याने त्यालाच मत द्या – तेजस्वी सूर्या
दरम्यान, बाबुश यांनीच घडवलेले सहकारी हे आज त्यांच्याच सुपुत्राच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. गोव्यात मतदान १४ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून याच दिवशी फ्रान्सिस डिसुझा यांचा स्मृतिदिन देखील आहे. हा अजब योगायोग यावेळी आल्याने बाबुश यांच्यावर प्रेम करणारी जनता बाबुश यांच्या स्मृतीदिनी मतदानरुपी आपला आशीर्वाद जोशुआ यांना देईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
Read also:
- ठाकरे-पवारांचा मुंबईत सकाळी सकाळी वजनदार दौरा; मिशन मुंबईची जोरदार तयारी
- गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी
- नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
- ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल
- हिंगणघाट जळीतकांड प्रकरण: तरुणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अखेर जन्मठेपेची शिक्षा