पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने पुन्हा एकदा प्रशासनाने 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र या लॉकडाऊनला पुणे व्यापारी महासंघाने विरोध दर्शवला आहे. महासंघाने या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी व्यापारी महासंघाची मागणी आहे.
व्यापारी संघाचे म्हणणे आहे की, “ यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये अब्जावधी रुपयांचा व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. मात्र आता पुन्हा लॉकडाउन केल्यानं 10 टक्के सुरळी झालेला व्यापार पुन्हा अडचणीत येईल. पुणे शहरात निर्बंध नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचबरोबर नागरिक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे दुकाने बंद करणे हा त्यावर उपाय नाही.”
व्याजाचे हप्ते आणि त्यावरील व्याज, विजेचे बिल द्यावे लागत आहे. दुकान भाडे, घर भाडे, घर खर्च असा अनेक खर्च वाढत चाललेला आहे. कोणतेही आर्थिक उत्पन्न नसल्याने गेल्या तीन महिन्यापासून आर्थिक फटका बसत आहे, असे महासंघाने म्हटले आहे.
दरम्यान, 13 तारखेपासून मध्यरात्रीला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन पुढचे 10 दिवस कायम राहील.