मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. आर्यन खान प्रकरणात NCB च्या कार्यपद्धतीवर टीका करताना नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप करत त्यांची अनेक प्रमाणपत्र समोर आणली होती. याविरुद्ध हायकोर्टात धाव घेतलेल्या वानखेडे परिवाराला आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा पण गिरणी कामगार करणार का? संजय राऊतांचा हल्लबोल
समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान नवाब मलिकांनी ९ डिसेंबपर्यंत सोशल मीडियावर वानखेडे परिवाराबद्दल काहीही पोस्ट करणार नसल्याची हमी दिली आहे.नवाब मलिकांतर्फे कोर्टात बाजू मांडणारे वकील कार्ल तांबोळी यांनी जस्टीस शाहरुख काठावाला आणि मिलींद जाधव यांच्या खंडपीठासमोर, “मी सर्व सुचना लक्षात घेतल्या असून ते ९ डिसेंबरपर्यंत कोणतीही गोष्ट पोस्ट करणार नाहीत”, असं सांगितलं.
३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम: २१ डिसेंबर रोजी होणार मतदान
याआधी वानखेडे परिवाराने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने नवाब मलिक यांना वानखेडेंबद्दल पोस्ट करताना थांबवलेलं नव्हतं. परंतू जस्टीस माधव जामदार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने मलिकांना पोस्ट करत असताना एकदा त्याबद्दलची खातरजमा करुन घेत चला असा सल्ला दिला होता. परंतू वानखेडे परिवाराची बाजू कोर्टात मांडणाऱ्या वकीलांनी कोर्टासमोर, नवाब मलिक वानखेडे परिवाराला जाणुनबुजून टार्गेट करत असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने ट्विट करत असल्याचा युक्तीवाद गेला.
मोठी बातमी: आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, सताभाऊ खोत यांची घोषणा
समीर वानखेडेंनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी याआधी केला होता. यावर बोलताना जस्टीस काठावाला यांनी, नवाब मलिकांनी ही बाब जात पडताळणी समितीसमोर मांडली आहे का? तर नाही…मग त्यांना नेमकं हवंय तरी काय? जर त्यांच्याकडे जात प्रमाणपत्राबद्दल पुरावे असतील तर त्यांनी तक्रार करायला नको होती का? प्रसारमाध्यमांसमोर येण्याआधी त्यांनी तक्रार करायला हवी होती असं परखड मत नोंदवलं.
Read Also :
- माझा पराभव झाला, म्हणून कट कारस्थान करणाऱ्यांनी धिंगाणा घातला; शशिकांत शिंदेंचा आरोप
- एसटी कर्मचाऱ्यांचा पण गिरणी कामगार करणार का? संजय राऊतांचा हल्लबोल
- खोत-पडळकरांनी आंदोलन सोडलं, पण आंदोलक एसटीची घंटी वाजू देणार नाही..
- फरार घोषित केलेले परमबीर सिंग अखेर आले समोर; मुंबईत दाखल झाल्याची माहिती
- नवाब मलिक यांनी झईदा वानखेडे यांचा मृत्यूचा दाखला ट्विट करत पुन्हा माजवली खळबळ