पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फुट पडली. त्यानंतर अनेक राजकीय गोष्टी घडताना दिसत आहेत. यातच आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा 5 ऑक्टोंबर रोजी दसरा होत आहेत. एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत असून त्याचा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
गणेशोत्सव अन् नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा ; चंद्रकात पाटील
नव्याने मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचा टीझर पाहण्यात आला. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ. सगळं कसं छान जमवून आणलं. फक्त एक निष्ठ शब्द त्यात राहिला आहे. असो. तसंही व्यावसायिक लोकांचं आणि निष्ठाईचं नातं काही असलं काय नसलं काय फरक पडत नाही. त्यावर आम्हाला काही बोलायचं पण नाही. परंतु तुमच्या 50 खोक्यातून सोडलेल ट्रेन, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण, वातानुकुलित बसेस, सगळ्या सुविधा असतील. परंतु आमचा शिवसैनिक मात्र जोपर्यंत बाळासाहेबांचे विचार प्रमाण मानतो. आपली कष्टाची भाकरी खाऊन पायी चालत शीवतीर्थापर्यंत पोहचेल. गद्दारीविरोधी, खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा मेळावा शिवतीर्थावर ऐतिहासिक मेळावा असेल त्याची साक्ष उभा महाराष्ट्र असणार आहे. असंही त्या म्हणाल्या.
“एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ”; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज
एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे.
“हे हिंदुत्वाचे सरकार आहे, इथे भक्तांचाच आवाज ऐकला जाईल;” तुषार भोसले
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या देखील दसरा मेळाव्याचा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची ताकद दिसणार ऐतिहासिक दसरा मेळावा असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी वाजत गाजत , गुलाल उधळत या.. पण शिस्तीत या असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. एक नेता, एक झेंडा, एक मैदान…. शिवसेनेच्या पारंपारिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा. असं देखील त्यात म्हटलं आहे. शिवसेनेचा हा दसरा मेळावा 5 आक्टोंबर रोजी सायंकाळी 06:30 वाजता होणार आहे.
#दसरा_मेळावा_२०२२ pic.twitter.com/mCQZs6rufq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 29, 2022
Read also
- वाजत गाजत , गुलाल उधळत या.. पण शिस्तीत..! मेळाव्यासाठी शिवसैनिकांना ठाकरेंचं आवाहन
- ममता बॅनर्जी, मायावती, केजरीवाल यांचा दाखला देत फडळकरांचा सुळेंना टोला; म्हणाले..
- “निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार..;” दसरा मेळाव्याचा शिवसेनेचा टीझर रिलीज
- सरनाईकांचा मतदार संघ भाजपला हवा..! शिंदे प्रताप सरनाईक यांच्यात कडाक्याचे भांडण
- राष्ट्रवादीचा बारामतीतील ओबीसींचा “हा” आक्रमक चेहरा भाजपने फोडला