जळगाव : एकीकडे गेले २५ वर्षे राज्याच्या राजकारणात एकत्र राहिलेल्या शिवसेना-भाजपा या दोन पक्षांतले अंतर वाढत असल्याच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत असतात. तसेच गेल्या काही महिन्यांत अश्या अनेक घटना राज्यात घडल्या, ज्यामुळे हे दोन पक्ष आता पुढे कधीही राजकारणात एकत्र येणार नाहीत, असे अंदाज बांधले जात आहेत. असे असताना काही नेत्यांमुळे, त्यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा युतीचा चर्चांना उधाण येते. अशीच एक घटना आज घडली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा राज्यात चर्चांना उधाण आले आहे.
गिरीश महाजन म्हणाले, ‘ती माझी चूक झाली, मी मान्य करतो’
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज एकाएकी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एकत्र नाश्ता केला व त्यानंतर दोघेही एकाच गाडीने अतिवृष्टीने बाधित भागाची पाहणी करण्यासाठी गेले. यामुळे, तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच पाटील यांनी महाजनांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने, हा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का असल्याचे सांगितले जात आहे.
लूकआऊट सर्क्युलरनंतर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, दिला ठाकरे सरकारला इशारा
जामनेर तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे पूरग्रस्त भागाच्या पाहणी करत असलेल्या पाटील यांनी महाजन यांचे घर गाठले. त्यांनतर दोघेही पाहणी करण्यासाठी पुढे गेले. तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जवळपास ४ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून, ३००हून अधिक घरांवरील छप्पर उडून गेले आहे. या नुकसान दौऱ्यात सर्वपक्षीय नेते एकत्र असून, सरकार म्हणून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळवून देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
शिवसेनेला अजून एक धक्का : माजी खासदार आनंदराव अडसूळ, मुलगा, जावयाकडे ईडीच्या धाडी
तसेच, ‘निवडणुका येतील, पक्षाचे विचार एकत्र येतील तेव्हा येतील, सध्या आम्ही एकमेकांच्या विरोधात राहू, पण शेतकऱ्यांसाठी आम्ही एकजूट आहोत. आमच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. पालकमंत्री या नात्याने स्थानिक आमदारांची भेट घेऊन परिस्थितीची आढावा घेणे, हा माझा हेतू होता. आम्ही चाळीसगावलाही एकत्रं होतो. हे शेतकऱ्यांवरचं संकट आहे. त्यासाठी सगळ्यांनी मिळूनच काम केलं पाहिजे,’ अशी भूमिका यावेळी महाजन यांनी मांडली.
Read Also :
- गणराया, पहिल्यांदा कोरोना दूर कर, काही लोकांच्या मनातील रोगही दूर कर – छगन भुजबळ
- नेता-अभिनेता असला तरी घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही! नांगरे पाटीलांनी ठणकावले
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मुख्य मंदिरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा
- उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी आजच्या काँग्रेसची अवस्था – शरद पवार
- मोठी बातमी : भाजपच्या माजी मंत्र्याची गळा दाबून हत्या; राहत्या घरातच सापडला मृतदेह