मुंबई : राज्यात येत्या काही महिन्यात, महत्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणूका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वच पक्ष आपापल्या पक्षाच्या संघटना बांधणीच्या तयारीला लागले असून, महत्वाच्या नेत्यांचे संघटना बळकट करण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी राज्यभर दौरे सुरु आहेत. दरम्यान, या महापालिका निवडणुकांत सर्वात जास्त चर्चा असते, ती देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिका समजल्या जाणाऱ्या ‘मुंबई महापालिकेची”.
महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राला, केंद्राकडून पाच पटीने कमी लसपुरवठा
मुंबई महापालिकेवर सध्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत आहे. मात्र, शिवसेनेचा हा ‘गड’ काबीज करण्यासाठी भाजप देखील आक्रमक झाली आहे. तसेच, येत्या निवडणुकात आधीच्या सरकारची, चार प्रभाग रचना पद्धती बंद करून, या सरकारने एक प्रभाग रचना पद्धत अवलंबण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर, याचा फायदा कुणाला होणार आणि याने नुकसान कोणत्या पक्षाचे जास्त होणार, याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
“आधी माहिती घ्या, मग आरोप करा,” राष्ट्रवादीचाही नाना पटोलेंवर जोरदार हल्लाबोल
दुसरीकडे, यावेळेस होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकात नेमकी काय समीकरणे पाहायला मिळणार, याचा अंदाज अजूनही कुणालाच लागत नाहीये. मात्र, काँग्रेसने स्वबळाचा नारा कायम ठेवला आहे, तर भाजपने देखील तीच ‘री’ पुढे ओढली आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी अशी आघाडी होणार; की दोघेही वेगळे लढणार; की युती होणार; की मनसे-भाजप एकत्र येणार, असं असतानाच भाजपने अजून एकदा स्वबळावर निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत.
“नाना पटोलेंनी जे आहे ते खाजगीत बोलावं, चव्हाट्यावर बोलू नये” शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त
आज वकील आणि भाजप नेते, आमदार आशिष शेलार सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी, तुम्ही मनसेला सोबत घेऊन मुंबई महापालिका निवडणूक लढणार का? या प्रश्नाला उत्तरं देताना, “नाही, आम्ही मनसेला सोबत घेणार नाही,” असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांत प्रत्येक पक्षाचे वेगळे रंग दिसण्याची शक्यता बळावली आहे.
Read Also :
- मोदी सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या तयारीत; ६ ऑगस्टला राज्यसभेत होणार चर्चा!
- कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा – संभाजी भिडे
- मोठी बातमी: संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!
- एकनाथ खडसे कधी सीडी लावताहेत याची वाट पाहतोय – राज ठाकरे
- ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा