मुंबई: वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. त्यानंतर लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेल्याचं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. याच प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
हे पण वाचा: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही” – भाजप
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्याविषयी विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, “आमच्यासाठी विषय संपला आहे, तोडफोड करणं आमची संस्कृती नाही. आम्ही तोडफोड करत नाही. काल प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटल्याचे सांगितले गेले, त्याबद्दल त्यांनी व्हिडीओद्वारे खुलासाही केला आहे. आमच्यासाठी विषय संपला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही’, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
हे पण वाचा: भाजपमधील भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला फारसा वेळ लागणार नाही – विनायक राऊत
दरम्यान लाड यांच्या या वक्तव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसाद लाड यांच्यावर अतिशय खोचक पद्धतीने टीका केली. लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना यासंबंधी आमचे शाखाप्रमुख बोलतील असा खोचक वार संजय राऊत यांनी केला. तर नाशिकमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी लाड यांच्या वक्तव्यावर मिश्किल भाष्य करत त्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असं हसत हसत भुजबळ म्हणाले होते.
Read Also :
- मुंबईतील मराठी आवाज टिकला आणि दिसला पाहिजे, बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस राज्यसरकार जबाबदार, एमपीएससीच्या जागेवरुन विद्यार्थी आक्रमक
- “सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल’’ सामनातून भाजप आमदारावर टीका
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी
- “स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, आम्ही देखील स्वबळाचा नारा देवू”- मुख्यमंत्री