औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठ वक्तव्य केल आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी नाव बदललं, आता फक्त सोपस्कार बाकी राहिला आहे. दरम्यान, औरंगाबाद शहराचं नाव आधीच बदललं असल्याचं देखील चंद्रकांत खैरे यांनी म्ह्टलं आहे. त्याचबरोबर खैरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे एमआयएमचे खासदार यांना देखील इशारा देत म्हटलं आहे की, इम्तियाज जलील काहीही बोलतो, हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवावं, आम्ही या शहराचं नाव बदलणारच आहोत असा आक्रमक पवित्रा माजी खासदार खैरे यांनी घेतल्याने पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. दरम्यान, खैरे यांच्या या विधानानंतर जलील नेमकं काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक एकर शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी द्या; शेतकऱ्याच पत्र
याअगोदर देखील कॉंग्रेसने फक्त शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी भूमिका काँग्रेससारख्या पक्षांनी घेतलेली आहे. मात्र, औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे.
शिवसेनेच्या बॅनरवरुन चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो गायब; संजय राऊतांचा मात्र भला मोठा फोटो
दरम्यान, एक नुकतीच घडलेली घटना म्हणजे एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर अस करण्यात आला आहे. त्यामुळे, आता या घडलेल्या वेगळ्याच प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून या घटनेला राजकीय रंग देण्याच काम सध्या राजकारणी करत असल्याच दिसत आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेसंदर्भात आक्रमक पवित्रा धरण केला असून, जलील यांनी हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
Read Also :
- माझ्या मागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे – संजयकाका पाटील
- शाहरुख खाननं भाजपात प्रवेश केला तर कोकेन नव्हे, पीठ सापडलं म्हणून सांगतील – छगन भुजबळ
- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला हारवणे शक्य नाही, म्हणून खुद्द शरद पवार रणांगणात – चंद्रकांत पाटील
- मोठी बातमी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण; आईंचीही टेस्ट आली पॉझिटिव्ह
- तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादच नाव संभाजीनगर करून दाखवाच – खासदार इम्तियाज जलील