राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रसिद्ध झाला. यात पवारांनी २०१४ मध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेने भाजपाबरोबर जाऊ नये अशी माझी पहिल्यापासून मनात इच्छा होती, ते जातील असे दिसले त्यावेळी मी जाणीवपूर्वक स्टेंटमेंट केले, आम्ही तुम्हाला(भाजपाला) बाहेरुन पाठिंबा देतो, त्यात शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी हा हेतू होता,असा खुलासा पवार यांनी केला आहे.
शरद पवार म्हणाले की, शिवसेनेने भाजपाबरोबर जाऊ नये अशी माझी पहिल्यापासून मनात इच्छा होती, ते जातील असे दिसले त्यावेळी मी जाणीवपूर्वक स्टेंटमेंट केले, आम्ही तुम्हाला(भाजपाला) बाहेरुन पाठिंबा देतो, त्यात शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी हा हेतू होता, पण तसं घडलं नाही, त्यांनी सरकार बनवलं, भाजपाच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचं नाही. कारण दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात, राज्याची सत्ता म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्या हातात. यामुळे शिवसेना आणि अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे हेच त्यांना मान्य नाही, त्यामुळे भाजपा आज ना उद्या या सर्वांना निश्चितपणे धोका देणार आहेत म्हणून ही राजकीय चाल होती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. (