इस्लामपूर : सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर दररोजज तोंडसुख घेत आहेत. त्यांच्या या टीकेच्या बाणांतून त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे देखील सुटले नाहीयेत.
दरम्यान, आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली असून, ‘जयंत पाटलांना आगामी २०२४ च्या निवडणुकीत घरी पाठवू,’ असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील इस्लामपूर मधल्या नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलात एका कार्यक्रमात बोलत होते, यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.
तसेच, ‘राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे बोलण्याचा देवाने आशिर्वाद दिला आहे. मात्र, कार्यकर्ते सोबत असतील तर २०२४ च्या निवडणुकीत आम्ही जयंत पाटील यांना घरी पाठवू. आपण जर आपल्यात एकजुट ठेवली असती, तर हे या निवडणुकीत देखील शक्य होतं. त्यामुळे, यावेळी पुन्हा एकदा सगळे जण एकजुटीने काम करु,’ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
Read Also :
- नक्षलवाद्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, छत्रपती संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया
- पाच वर्ष मुख्यमंत्री’पद दिलं तर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार?
- भाजपचे राम शिंदे पवारांच्या दारात; चर्चेला उधाण
- भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न झाले : संजय राऊत
- मोदी सरकार देशवासियांना बनवतेय भिक्षेकरी, नाना पटोलेंचा आरोप