मुंबई : क्रूझवरील ड्रग्स पार्टीवरून एनसीबी विरुद्ध एनसीपी असा सुरू असलेला संघर्ष आता वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. भाजपमधील नेत्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांना फडणवीस दाम्पत्यानं प्रत्युत्तर दिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दांत फडणवीसांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्जचा खेळ सुरु; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप
देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादानं राज्यात ड्रग्जचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला. त्यावर दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली आहे. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला. त्यावर आता मुख्यमंत्री ठाकरेंनी भाष्य केलं आहे. काही जण म्हणतात दिवाळीनंतर बॉम्ब फोडू. मी पाकिस्तानात बॉम्ब कधी फुटतील, याची वाट पाहतोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. राजकीय फटाक्यांसाठी दिवाळीची गरज नाही, असंही ते म्हणाले.
मलिकसाहेब, तुम्हाला हे सगळं झेपेल का? चंद्रकांत पाटलांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांचे ड्र्ग्स माफियांशी संबंध आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात ड्रग्सचा खेळ सुरू आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुरुवात नवाब मलिक यांनी केली आहे. आता शेवट मी करणार. त्यांनी लवंगी लावली, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. नवाब मलिक यांचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन उघड करणार असून, त्याचे पुरावे शरद पवार यांनाही देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Read Also :
- नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; पंकजा मुंडेची पहिली प्रतिक्रीया… म्हणाल्या…
- फडणवीसांना ‘वानखेडे’ प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न; नवाब मलिकांना परिणाम भोगावे लागणार – चंद्रकांत पाटलांचा इशारा
- अखेर ‘नॉट रिचेबल’ अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल; कसून चौकशी होणार?
- नवाब मालिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, दिवाळीनंतर बाँम्ब फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
- ड्रग्स पेडलर आणि भाजपाचं नातं काय? अमृता फडणवीसांचा ‘तो’ फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा निशाणा