नाशिक : शहरात मंजूर अभिन्यास आणि आर्थिक दुबल घटकांसाठी देय असलेल्या सदनिकांची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नोव्हेंबर महिन्यांत मागितली होती. पंरतु नाशिक पालिकेचे आयुक्त कैलाश जाधव यांनी वेळेत न दिल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याजागी आता बृहन मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण; पुणे पोलीस उपायुक्त पंकड डहाणे यांची कसुन चौकशी
या प्रकरणासंदर्भात सोमवारी विरोधी प्रवीण दरेकर यांनी देखील विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. नाशिक शहरात 2013 पासून आतापर्यंत एक एकर क्षेत्रापेक्षा अधिक अभिन्यास मंजूर झाले. म्हाडाकडे आर्थिक दुबल घटकांसाठी किती घरे देण्यात आली होती. याची माहिती नोव्हेंबर महिन्यात जितेंद्र आव्हाड यांनी मागितली होती. मात्र कोरोनाचा कारण देत कैलाश जाधव यांनी माहिती दिली नाही.
“आगे आगे देखो होता है क्या”; ईडीच्या कारवाईनंतर राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा
नाशिक महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार 52 तात्पुरते तर 30 अंतिम अभिन्यास मंजूर करण्यात आले होते. त्यातील 157 सदनिका म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. तर 4 हजार 300 सदनिका निर्माणधिन असून त्या लवकरच म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. तर या प्रकरणात कोणत्याही प्रकराची अनियमीतता झाला नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे प्रशासक कैलाश जाधव यांच्या बदलीचे नक्की कारण काय? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड या प्रकरणाबाबत म्हणाले की, नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. तर आमदार कपील पाटील यांनी या प्रकरणात सातशे कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी महापालिका आयुक्त कैलाश जाधव यांना हटविण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली.
Read also:
- पुणे स्थायी समिती अध्यक्ष अधिकार वाद; महापालिकेच्या विरोधात हेमंत रासने थेट न्यायालयात
- “सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार”; किरीट सोमय्यांचा एल्गार
- राणें पाठोपाठ मोहित कंबोज निशाण्यावर; मुंबई महानगरपालिकेडून राहत्या सोसायटीमध्ये झाडाझडती
- काश्मीर फाईल्स इंटरवलनंतर फार बोरिंग सिनेमा; जयंत पाटलांचा फडणवीसांना मिश्कील टोला
- गुढी पाडव्याला मनसेचे मुबंईत विराट शक्तिप्रदर्शन; महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे रणशिंग फुंकणार