पुणे : मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. मात्र, असे असले तरीही पुण्याच्या मध्यवर्ती भागात नागरिक गणेश दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. दुसरीकडे नव्या बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या दिवशीही जिल्ह्यात काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची माहिती आज पुण्यातील आढावा बैठकीत पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात उद्यापासून संचारबंदी लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार
या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, ‘विसर्जनाच्या दिवशी पुण्यात सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा व रेस्टॉरंट-हॉटेल सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा, रेस्टॉरंट-हॉटेल वगळता इतर सर्व दुकानं रविवारी पूर्णपणे बंद राहणार आहेत. या निर्बंधाबाबत जिल्ह्यातल्या सर्व आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी मिळून हा निर्णय घेतला आहे. तसेच, हे निर्बंध पिंपरी चिंचवडसह कॅन्टोनमेंट क्षेत्रालाही राहणार आहेत,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी विविध मोठ्या घोषणा
यावेळी त्यांनी इतरही काही घोषणा केल्या, त्याप्रमाणे सिंहगड परिसराचा विकास आराखडा तयार आहे. त्यानुसार किल्ल्याला शोभेल अशा पद्धतीचे बांधकाम करून पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. सिंहगडावरच्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. सिंहगड परिसरात आता टपऱ्या उभारून देण्यात येणार नाही. सुटसुटीत दुकानांची निर्मिती केली जाणार असून, किल्ल्यावरील पर्यटनाला शिस्त लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय राऊत-चंद्रकांत पाटील यांच्यात रंगले ‘विनोदी’ शाब्दिक युद्ध
तसेच, पीएमपीएमएलच्या प्रायोगिक तत्वावर ई-वाहन सुरू करणार आहे. सध्याच्या घडीला ३५ – ४५ ई बस तयार आहेत. ई-वाहनांचा उपयोग पायथ्यापासून वर जाण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी तिकीटही आकारले जाणार असून, ते माफक दरात असेल. याशिवाय स्थानिक तरूणांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी, काँग्रेस पदाधिकाऱ्याची पटोलेंकडे मागणी
दरम्यान, गणपती उत्सवानिमित्ताने पुणे शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करताना 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत 144 कलम लावण्यात आले आहेत. जमावबंदी, प्रार्थनास्थळंबंद ठेवण्यासंबंधी तसेंच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले आहेत. दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस आदी) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई आहे.
Read Also :