मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या संपुर्ण राज्यात जाहीर सभा होत आहेत. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला लोकांची तुफान गर्दी जमा झाली होती. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदेंवर जोरदार टिका करण्यात आली. यातच आता त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यावर खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा….पुणे भाजपचे शहराध्यपद बदलणार, पुढील आठवड्यात होणार घोषणा ?
त्यांना तोंड दाखवयाला जागा शिल्लक राहिली नाही, अन् काय ते आम्हाला करारा जवाब देणार. फक्त प्रसिद्धी माध्यामांवर घोषणा देत आहेत. यांच्यात काही करारा जवाब पण नाही आणि हिमंत पण नाहीय. तसेच गद्दार माणूस काय करारा जवाब देऊ शकतो. ? असा खोचक सवालही त्यांनी केला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आज सांयकाळी सभेत काय बोलणार? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज नामांतरणाच्या मुद्दयावरून हिंदू मोर्चा काढण्यात आला आहे. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, ज्या काही संघटना एकटल्या आहेत. त्यांचं हिंदूत्व बेगडी आहे. उद्या एखादा दगड आला तर याच्यातील एकही माणूस थांबणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे. खासदार इम्तियाज जलील आणि भाजपने एकमेकांशी लागेबांध करून हे आंदोलन केलं आहे. असंही अंबादास दानवे म्हणाले.
Read also
- हेही वाचा….“संजय गायकवाडांनी संपकरी कर्मचाऱ्यांची लायकी काढली”,राष्ट्रवादीने साधला निशाणा
- हेही वाचा…“मुंब्रामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली”, आव्हाडांचं ते ट्विट चर्चेत
- हेही वाचा….इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक
- हेही वाचा….उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा
- हेही वाचा…उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा