पुणे : मागील 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 32 लाख 31 हजार 143 इतकी होती. त्यात 2017 मध्ये 11 गावांचा समावेश झाला. त्यांची लोकसंख्या 2 लाख 39 हजार 483 इतकी होती. आता नव्याने पुन्हा 23 गावांचा समावेश झाला, या गावांची लोकसंख्या 1 लाख 85 हजार 198 आहे. त्यानुसार शहराची एकूण लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 इतकी आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यातील नगरसेवकांची संख्या 183 इतकी होण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीमच आहे, हिंदू नाही; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा
दरम्यान, लोकसंख्याच्या निकषानुसार नगरसेवकांची संख्या निश्चित होत असली तरी, 2011 ची लोकसंख्या आणि प्रत्यक्षात आत्ताची लोकसंख्या यात मोठी तफावत आहे. आता ही तफावत दूर करण्यासाठी ज्या कायद्यातील तरतुदीनुसार नगरसेवक संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्या कायद्यातच सुधारणा करण्याची भुमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. त्यामुळे 30 लाख लोकसंख्येला 161 नगरसेवक तर त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे एक नगरसेवक या तरतूदीत बदल करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव येत्या मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरविकास खात्याकडून येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
महापालिका रणधुमाळी २०२२: विद्यमान नगसेवकांना प्रभाग रचनेचा धसका; सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच
या सुधारीत कायद्यातील तरतुदीनुसार पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 10 टक्के इतकी वाढण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. लोकसंख्येच्या निकषानुसार सद्यस्थितीत 166 नगरसेवक होत आहे. त्यात 10 टक्के वाढ म्हणजे ही संख्या 17 इतकी वाढून होऊन 183 इतकी होईल. त्यात प्रत्येक जातीयनिहाय लोकसंख्यानुसार आरक्षित जागांची संख्या वाढणार आहे
Read Also :
- समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्स प्लांट करतो; NCB अधिकाऱ्याचं खळबळजनक निनावी पत्र
- बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का? प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना धमकी
- महापालिका रणधुमाळी २०२२: विद्यमान नगसेवकांना प्रभाग रचनेचा धसका; सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच
- शिवसेनेते असताना मी पक्ष मोठा केला, तेव्हा संजय राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा पटलवार
- एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा; भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर