नाशिक : राज ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत तसंच ते पुढचा दौरा विदर्भ, कोकण या ठिकाणी दौरा करणार आहेत, सध्या पक्ष बांधणी सुरु असल्याचं त्यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितलं. यावेळी राज ठाकरेंना ST कर्मचाऱ्यांच्या संपावरती प्रश्न विचारला असता ते म्हणाले. ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या संप हा सर्व युनियन बाजूला सारून कर्मचारी एकत्र आलेला हा संप आहे, तुमच्याकडे लोकांनी राज्य दिलंय ते अरेरावी करण्यासाठी नाही असा टोला त्यांना आघाडी सरकारला लगावला.
राज्यात ज्याला आजपर्यंत दोन अंकी पाठबळ मिळालं नाही त्याला तुम्ही पंतप्रधान करणार – सताभाऊ खोत
तसंच एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी विनापगार गेली, ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती देखील राज य़ांनी यावेळी दिली. शिवाय एसटी मधला भ्रष्टाचार थांबत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही असही ते यावेळी म्हणाले. शिवाय या कर्मचाऱ्यांवरती अरेरावी करण्यापेक्षा संवादातून मार्ग काढा 1 लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला ST कर्मचाऱ्यांनाही कुटुंब आहे, त्यांना वाऱ्यावर सोडणार का? असही राज ठाकरे म्हणाले.
निवडणुका रद्द होणार की ओबीसींशिवाय?; आज महत्वाचा दिवस, सुप्रीम कोर्टात सुनावणी
दरम्यान राज्यात परीक्षांचे सुरु असणारे घोळ याबाबत विचारलं असता ते म्हणाले ‘या गोष्टी जोपर्यंत लोकं मनावर घेणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही, लोकं ऐनवेळी मतदान कुणाला करतात जोपर्यंत मतपेटीतून जनता यांना उत्तर देत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार आत्ता चिडायच आणि निवडणूकीला भलत्याच विषयांवरती मतदान करणार असाल तर कसं हे सुधारणार त्यामुळे परिस्थिती सुधारणार नाही. ज्या त्रासातून पाच वर्ष काढली ते लोक विसरतात हे राज्यकर्त्यांना माहिती आहे ते मुळेच ते असं वागतात त्यामुळे नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, तर सुज्ञ ही असावं लागतं असही ते यावेळी म्हणाले.
Read Also :
- भाजप आमदाराच्या वाढदिवसाला एकनाथ खडसेंची हजेरी, राजकीय चर्चेला उधाण..!
- अजित पवारांची ऑफर; राष्ट्रवादीला निवडून द्या 100 कोटी देतो…!
- किरीट सोमय्यांच्या रडारवर आता महाविकास आघाडीतील ‘हा’ नेता..
- “ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
- पेपरफुटी प्रकरण: जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अभाविपची निदर्शने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची उचलबांगडी