मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक हे सध्या देशभर चर्चेत आहेत. त्यांचं कारण म्हणजे त्यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि भाजप यांच्यावर केलेले गंभीर आरोप. अनेक पत्रकार परिषदा घेऊन नवाब मलिकांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
आमदार महेशदादा लांडगेचं फेसबुक प्रोफाइल आता झालं अधिकृत, ब्लू-टिक असलेले शहरातील प्रथम आमदार
१ नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत तर त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. विरोधकांच्या विरोधात उघडलेल्या या मोहिमेचा पुढचा भाग म्हणून आता ते रविवारी आणखीन एक खुलासा करणार आहेत. हॉटेल ‘The Lalit’ मध्ये काय गुपितं दडलीयं? याबाबत नबाब मलिक रविवारी सांगणार आहेत.
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय होहोटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
नवाब मलिकांनी आज एक सुचक ट्विट केलंय. त्यात त्यांनी सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि नंतर “हॉटेल द ललितमध्ये खूप सारी गुपितं दडली आहेत, रविवारी भेटुयात” असं ट्विट त्यांनी केलं आहे. Hotel The Lalit हे मुंबईतील एक महागडं असं पंचतारांकित हॉटेल असून अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही याठिकाणी येत असतात. त्यामुळे नवाब मलिक या हॉटेलातलं कोणतं गुपित बाहेर आणतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Read Also :
- 100 कोटी वसुली गुन्ह्यातील कमाईचे मुख्य लाभार्थी अनिल देशमुखचं; ईडीचा कोर्टात दावा
- सरकार अस्थिर करण्यासाठीच चौकशा लावल्या जाताय आहेत – धनंजय मुंडे
- भाजपच्या जनआक्रोश मोर्चात नियमांची ऐशीतैशी; गिरीष महाजन, रक्षा खडसेंसह आमदार-खासदारांवर गुन्हा दाखल
- भाऊबीजेची ओवाळणी म्हणून अजित दादांकडे गॅस सिलेंडरच मागणार – सुप्रिया सुळे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही