कणकवली : संतोप परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्यावर आरोप झाले आहेत त्यानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यांनी नितेश राणे कुठे आहेत मला माहितीये पण मी का सांगू? त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत असल्याचं राणे म्हणाले. नितेश राणेंना अटक करण्यासाठी पोलिस यंत्रणा शोध घेत असतानाच मुलगा कुठे आहे? हे सांगण्यास नारायण राणे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे, नितेश राणे यांना अटकेच्या भितीने नारायण राणे घाबरलेत का? त्यामुळे, मुलगा कुठे आहे? हे माहित असतानाही सांगत नाहीत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका – नाना पटोले
राज्याचा डिजी, राज्यातले पोलीस कशाला आले आहेत, मारहाण किरकोळ झाली आहे मग कशाला आले आहेत. नितेश राणे काय आतंकवादी आहेत का? एका आमदारासाठी एवढी यंत्रणा कशाला. उजव्या बाजूला खरचटल्यावर 307 लावतात हे मी पहिल्यांदाच बघतोय असे नारायण राणे म्हणाले. त्याचबरोबर पोलिसांनी दवाखान्यात जाऊन आपल्या पत्नीची चौकशी केल्याचं सांगितलं आहे.
ठरलं तर..! राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार; तारीखही फिक्स
“विधिमंडळात नितेशनं म्याँव म्याँव केलेलं नाही. तो काही असंसदीय शब्द नाही. मग तुमची काय हरकत आहे. मांजराचा आवाज कोण काढतं की ज्यामुळे संताप झाला? आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? त्याच वेळी कुणी अजून कसला आवाज काढला असता, तर ते तसेच आहेत का? मांजरीचा आवाज काढला म्हणून राग का यावा?” असा सवाल नारायण राणेंनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. “मी अन्याय सहन करणाऱ्यातला नाही. विधिमंडळात सगळ्याच चांगलं काम नितेश राणे करतो आहे”, असं कोतुक देखील नारायण राणेंनी केलं.
आज अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे कोर्टात; नागरपूरचा दौरा अर्धवट सोडून नारायण राणे कणकवलीत दाखल
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी अजित पवारांनी विधानसभेत मांडलेल्या भूमिकेविषयी विचारणा केली असता नारायण राणेंनी त्यावर निशाणा साधला. “कोण अजित पवार? मी ओळखत नाही अजित पवारांना. राज्यातल्या लोकांच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांच्याबाबत संदर्भ का देत नाहीत तुम्ही?” असा उलट प्रश्न त्यांनी अजित पवारांना केला.
Read also:
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; शरद पवारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन
- मोठी बातमी: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक होणार नाही, ठाकरे सरकारच्या बैठकीत निर्णय
- संरक्षण मंत्री असताना मुली लष्करात याव्या यासाठी मी प्रयत्न केले; शरद पवारांचे प्रतिपादन
- वाघाला पाहून म्याव म्याव करणारे आज लपून बसले आहेत; माजी गृहमंत्री दीपक केसरकरांचा राणेंना टोला
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला; हल्लखोरांकडे पिस्तूल, तलवारी असल्याचा संशय