नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते, ते भाजपमध्ये प्रवेश करतील. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
सरकार ज्या- ज्या ठिकाणी जागा देईल तिथे आम्ही आमच्या पैशातून विकास करणार – नितीन गडकरी
देगलूरचे माझी आमदार सुभाष साबणे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला नरसी नायगावमध्ये पोहचले होते. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर या देगलूर बिलोली मतदारसंघात पोट निवडणूक होणार आहे. सुभाष साबणे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा बाजीगर कोण? तीन ४३ च्या प्रभाग रचनेत कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार?
काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे आगामी काळात पोटनिवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथील राजकारण तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.
Read Also :
- राज्यातील विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज – चंद्रकांत पाटील
- रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद – फडणवीस
- विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्व्हेसाठी शेतकऱ्यांकडे पाचशे रुपये मागतात; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
- …म्हणून भाजप आमदाराने मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं; चंद्रकात पाटलांनी दिलं स्पष्टीकरण
- पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार रिंगणात; भाजपची नव्या रणनीतीकडे कुच?