मुंबई : राज्यातील दुकानांच्या पाट्या आता मराठीत असणार आहेत. त्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कुणी या निर्णयाचं स्वागत करत आहे, कुणी याचं श्रेय घेत आहे तर कुणी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. मराठी पाट्यांचं श्रेय हे मनसेचं असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं त्यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर पाट्या मराठीतच कराव्या लागतील; राऊतांचा सज्जड दम
संजय राऊत म्हणाले, कुणी काय सल्ला दिलाय यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी शिवसेना स्थापन केली त्यावेळीपासून हे आंदोलन सुरू आहे. आता असं आहे की अनेक जण आमच्या पक्षातून बाहेर गेले पण विचार तोच घेऊन गेले आहेत ना? कोणाला काय बोलतायत किंवा बोलतील यावर महाविकास आघाडीचं किंवा शिवसेनेचं धोरण ठरत नाही. मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. मराठी अस्मिता राहणार त्याच्याशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही.
मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा नेता; भाजप नेते प्रविण दरेकरांच वर्चस्व संपुष्टात?
दुकानावरील पाट्याही आता मराठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत हे श्रेय केवळ महाराष्ट्र सैनिकांचं असल्याचं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.
गेली १८ दिवसांपासून गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे अखेर माध्यमांसमोर प्रकटले
काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय गेतला. तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांना मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
Read also:
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राने काय मांडले मुद्दे? राजेश टोपेंनी दिली सविस्तर माहिती
- अजित पवारांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर; पुण्यातील बड्या बिल्डरकडे २० लांखाच्या खंडणीची मागणी
- पाट्या बदलण्याचा खर्च जास्त की काचा बदलण्याचा? संदीप देशपांडेंचा अमराठी व्यवसायिकांना इशारा
- मराठी पाट्या लावायला सांगणारे सरकार मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? इम्तियाज जलीलांचा चिमटा
- लवकरच राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दिसतील; माजी आमदार विजय गव्हाणेंचा गौफ्यस्पोट