पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा मतदार संघाचा पुढचा खासदार कोण ? या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणुक घ्यावी लागणार आहे. त्याआधीच लोकसभा मतदार संघात भाजप कुणाला तिकीट देणार याची उत्सुकता सगळ्याच कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.
हेही वाचा…“साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं”, गिरीश बापटांच्या निधाननंतर चंद्रकांत पाटील भावूक
गिरीश बापट यांची राजकारणातील सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध पाहता ही निवडणुक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जातील. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने टिळकांच्या घरात उमेदवारी न देता त्यांनी स्थायी समितीची अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. याचा फटका भाजपला चांगलाच बसला आहे. त्यामुळे याची खबरदारी भाजपकडून घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मंत्रीपद अन् पालकमंत्रीपदावरून तानाजी सावंत नाराज, शिंदे गटात आलबेल नाही”?
तर दुसरीकडे बापट यांच्या कुटुंबीयातच उमेदवारी देण्याचा भाजप देण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये मग गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट आणि स्नुषा स्वरदा बापट यांच्या नावाचा विचार भाजप करू शकतो. तर दुसरीकडे कसब्याच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास अधिकच उंचावला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी देखील आपला उमेदवार देण्याच्या प्रयत्नात असेल.
हेही वाचा…“गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्ठाळू नेते होते” पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बापटांना भावपूर्ण श्रध्दांजली
दरम्यान, भाजपने जर बापट कुटुंबीया व्यक्तिरिक्त उमेदवारी देण्याचा विचार केला तर पुण्यातील अनेक नावे सध्या चर्चेत आहेत. यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आणि माधुरी मिसाळ ही नावे चर्चेत आले आहेत. त्यामुळे आता भाजप कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
हेही वाचा…“गिरीश बापट गेले, भाजप-शिवसेना युती टिकवण्यासाठी त्यांचे मनापासून प्रयत्न होते “, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“ठाकरे गटाचे आणखी दोन खासदार भाजपच्या संपर्कात,” केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
हेही वाचा… संजय राऊतांना कोर्टाचा मोठा दणका, ‘इतक्या’ रूपयांचा ठोठवला दंड
हेही वाचा…“आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडून, आरोग्यमंत्री स्वत:चीच पाठ थोपटण्यात व्यस्त”
हेही वाचा…“आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, भाजपला संशय, मनसुख हिरेन २.० असल्याचा दावा”