पुण्यातील कोरोनाची स्थितीसुद्धा गेल्या काही दिवसांत अधिक चिंताजनक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात सुरु असलेला १० दिवसांचा लॉकडाऊन काल संपला आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या काळातच पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाण वाढला आहे.पुण्याला लॉकडाऊनचा नेमका किती फायदा झाला ? याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पुण्यात लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येवर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले कि, “लॉकडाऊनचा निर्णय हा केवळ पालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासन स्वतंत्रपणे घेत नाहीत. तर राज्य सरकारकडूनही तसेच स्पष्ट निर्देश आलेले असतात.
त्याचप्रमाणे, लॉकडाऊनमध्येच कोरोनाबाधितांची संख्या वाढली असेही आपण म्हणू शकत नाही. कारण, गेल्या काही दिवसांत पुणे महापालिकेने टेस्टिंगचे, अँटिजीन रॅपिड टेस्टिंगचे प्रमाण वाढवले आहे. आजही देशात सर्वात जास्त टेस्टिंग करणारे शहर पुणे आहे. त्यामुळे टेस्टिंगचे प्रमाण वाढल्याने आपल्याला पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे”, असे मुरलीधर मोहोळ यांनी