आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (मुख्यमंत्री ठाकरे) एका ठिकाणी बसून सगळी टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत. असं सांगून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची शनिवारी पत्रकार परिषदेत पाठराखण केली.
कोरोनाचे सबंध महाराष्ट्रावर संकट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या जिल्ह्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेता येणे अवघड होईल. आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (मुख्यमंत्री ठाकरे) एका ठिकाणी बसून सगळी टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत. मला करमत नाही. मी सतत लोकांत राहणारा माणूस आहे, मला एका जागी बसवत नाही. म्हणून मी फिल्डवर जात असल्याचे सांगून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची शनिवारी पत्रकार परिषदेत पाठराखण केली. 80 वयोमान असूनही राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन शरद पवार आढावा घेत आहेत पण मुख्यमंत्री काही बाहेर पडत नाही, या टीकेवर पवार यांनी भाष्य केले.