मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केलेल्या वक्तव्याचा समाचार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. नारायण राणेच्या वक्तव्यावर कारवाई केली जाते पण नाना पटोलेंच्या वक्तव्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली आहे. जो न्याय राणेंना तो न्याय नाना पटोलेंना का नाही असा सवाल करत त्यांनी राज्यात ‘हम करे सो कायदा’ असं चित्र असल्याची टीकाही केली आहे.
मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत – संजय राऊत
पाटील म्हणाले की, “राज्यातील पोलीस हे दबावाखाली काम करत आहेत. पंतप्रधानांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अद्याप गुन्हा नोंद करुन घेण्यात आला नाही. त्यामुळे पटोलेंच्या वक्तव्यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि न्यायालयात दाद मागणार आहे.”
नाना पटोलेंना मोदींबद्दलच वादग्रस्त वक्तव्य भोवणार? भाजपची पोलिसांत तक्रार दाखल
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, नाना पटोले म्हणतात मोदींना मारु, नवाब मलिक म्हणतात फडणवीसांना काशीचा घाट दाखऊ. या सर्वावरुन राज्यात हम करे सो कायदा असं चित्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर भंडाऱ्यातील गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोलत होतो अशी सारवासारव त्यांनी केली. पण निवडणुकीच्या धर्तीवर भाजपने हा मुद्दा चांगलाच तापवला असून आज राज्यभर नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली.
Read also:
- शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, नाना पटोले तुमचे हात सांभाळा; अनिल बोंडेंचा इशारा
- पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे चुकीचे; आमदार रोहित पवारांनी केली मोदींची पाठराखण
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुट्टी नाहीच; न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला
- सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले – अमृता फडणवीस
- भाजप आमदाराचा निष्काळजीपणा; कोरोना पॉझिटीव्ह असताना आंदोलनात सहभाग