मुंबई : मुंबई महापालिकेने लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले होते. मात्र, एकही कंपनी पात्र न ठरल्याने हे टेंडर रद्द करण्यात आले. आता लवकरच रशियाच्या स्पुतनिक लसींचा साठा मुंबईला मिळण्याची शक्यता आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली.
रशियन लस स्पुतनिकसाठी मुंबईत जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली. कोल्ड स्टोरेजसाठी जागेची चाचपणी सुरू आहे.
स्पुतनिक लसीसाठी रेड्डीज सोबत चर्चा सुरू असून, जून अखेरीस थोड्या लसी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लसी साठविण्यासाठी मुंबईत कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे.
कांजूरमार्गसारखेच विशेष कोल्ड स्टोरेज उभारण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. महापालिकेने स्पुतनिक लसीच्याशहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी सोयीस्कर होईल, अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
Read Also :