पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे भोसले हे उपोषणाच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील नऱ्हे येथे एका खासगी कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मोठी बातमी: ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, मला सरकारने आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी भाग पाडू नये. लवकर निर्णय घ्यावा. आरक्षणासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, पण त्यांची उत्तर उत्तरे म्हणजे सरकारी बाबूंनी दिलेली उत्तरे आहेत. आता चर्चा खुप झाली, ज्या दिवशी मराठा समन्वयक सांगतील त्यादिवशी मी आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे.
लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका; अजित पवारांनी कंत्राटदारांना भरला दम
त्याचबरोबर, आरोग्य विभागाच्या राज्य सरकारच्या परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे भोसले म्हणाले, अशा पद्धतीने परीक्षा रद्द होणे दुर्देवी आहे. ‘आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत. याबत दिली सरकारने चांगले काम केले आहे. त्यांचा आदर्श आपणही घ्यायला हवा. विद्यार्थ्यांना सरकारने प्रवास खर्च देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
Read Also :
- ज्ञानाची दारं ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला उघडणार; थिएटरचे दर्शन मात्र २४ ऑक्टोंबरला मिळणार
- परीक्षेतील गोंधळाला भ्रष्टाचारी सरकारच जबाबदार; काळ्या यादीतील कंपनीची सीआयडी मार्फत चौकशी करा – भाजप
- साहेब, ३००० रु खर्चकरून आलोयं, माय १५० रु रोजाने कामाला जाते; शेतकऱ्याच्या मुलांशी खेळू नका हो…
- दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- …तर ‘मातोश्री’ हे जेल म्हणून घोषित करायचं ठरलं होतं; छगन भुजबळांचा धक्कादायक खुलासा