मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या व्हिडीओत नाना पटोले हे मोदींना मारण्याची आणि शिव्या देण्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत पटोलेंच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून अटकेची मागणी करण्यात येत आहे. तर तिकडे नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे.
मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचे आक्षेपार्ह वक्तव्य
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली.
काँग्रेस हा लोकशाहीतील राजकीय पक्ष की दहशत पसरविणारे संघटन? पटोलेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचा संताप
देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून बावनकुळे आणि इतर भाजपा नेत्यांनी पोलिसांना केली. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा नेते आनंदराव राऊत, अजय बोढारे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Read also:
- मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत – संजय राऊत
- नानाभाऊंनी, राजीनामा देवून पुण्याच्या येरवड्यात दाखल व्हावं; महापौर मुरलीधर मोहोळांचा सल्ला
- पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो; नाना पटोलेंचा यु-टर्न
- हिंमत असेल तर गोव्यातून निवडणूक लढवा; चंद्रकांत पाटलांचे राऊतांना खुले आव्हान
- नाना पटोलेंची भाषा आक्षेपार्ह, त्यांना तात्काळ अटक करा; नितीन गडकरी, नारायण राणे आक्रमक