सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात शिवसैनिक संतोष परब हे जबर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी या हल्ल्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
“…खरंतर नवाब मालिकांनी माफी मागितली पाहिजे”; सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात
नितेश राणे यांचा कार्यकर्ता गोट्या सावंत आणि आणखी एका आरोपीस या संदर्भात अटक करण्यात आली आहे. काळ नितेश राणे यांच्या अटकेसाठी देखील कोकणात महाराष्ट्रातील १२ उच्चस्तरीय पोलीस अधिकारी पाठवण्यात आलेले आहेत. नितेश राणे हे गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.
“पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय?”; पडळकरांवरील हल्ला प्रयत्नावर फडणवीस विधानसभेत आक्रमक
आता आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ होण्याच्या शक्यता बळावली आहे. काल नितेश राणे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. यावेळी तीन तासांच्या वर सुनावणी चालली. न्यायालायने या तीन तासांच्या सुनावणीत कोणताही निर्णय न दिल्याने आता जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. काल न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने तो वाढवून देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. परंतु, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होईल, असे न्यायालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी टोचले आमदारांचे कान
नितेश राणे यांच्या वतीने ऍड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाच्या वतीने प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील यांनी प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना म्हटले आहे की आम्ही आमच्या बाजूने खासगी पक्षातून आलेल्या सर्व प्रश्नांना उत्तर दिले आहे. आमचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकलेला नाही. उद्या ऊर्वरीत युक्तिवाद पूर्ण करण्यात येईल. अंतरीम जामिनाची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
Read also:
- “मला आत्महत्या कराविशी वाटते”… आणि शिवसेनेच्या ‘त्या’ आमदाराला विधानसभेतच रडू कोसळले.
- “मुख्यमंत्री येणार हे लिहून देऊ का?”, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा शब्द मुख्यामंत्र्यांनी फोल ठरवला?
- अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी…
- ‘कॉक कॉक कॉक कॉक…, बाबा मला वाचव’; शिवसेनेच्या मोर्चात नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी
- “बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत”, शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा टोला