पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीला लस निर्मितीसाठी 25 कोटी रुपये देणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड भाजप अध्यक्ष आणि आमदार लांडगे यांनी दिली आहे.
यासंदर्भात हिंदुस्थान अँटिबायोटिक्स पिंपरी द्वारा कोविड लस, रेमडेसिव्हिर आणि ब्लॅक फंगस औषध निर्मितीस प्रारंभ करण्यासाठी हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लि. चे अध्यक्ष खासदार मनोज कोटक व एम.डी. नीरजा सराफ व महेश लांडगे यांची बैठक पार पडली. या बैठकीत महानगरपालिकेच्या माध्यमातून HA कंपनीला लसनिर्मिती प्रोजेक्ट करण्यासाठी 25 करोड रुपये मदत करण्याचे आश्वासन महेश लांडगे यांनी दिले.
काही दिवसांपूर्वीच हिंदूस्थान अँटिबायोटिक्स कंपनीमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी पंचवीस कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव महापालिका स्थायी समिती सभेमध्ये सर्वक्षीय सदस्यांनी एकमताने मंजूर केला होता. सर्व परवानग्या आणि केंद्राचा निधी वेळेत मिळाल्यास जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिण्यापर्यंत एच. ए. मध्ये कोरोनावरील लस उत्पादन सुरु होईल, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी व्यक्त केला होता.
प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा पाठपुरावा करू आणि याच्या अंमलबजावणीने सर्व लोकांना त्वरित दिलासा मिळेल, असेही महेश लांडगे म्हणाले.
Read Also :